महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘कर्वी ग्लॅमर’चा भव्य सोहळा; मिस्टर-मिस-मिसेस इंडिया प्लस साइज ब्यूटी पेजेंटचा ग्रँड फिनाले संपन्न.दै. मुंबई हलचलचे संपादक दिलशाद एस. खान यांचा सन्मान..

0
New-Doc-03-13-2026-12.15.jpg


मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या भूमीवर पहिल्यांदाच देशातील सर्वात मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा मिस्टर, मिस आणि मिसेस इंडिया प्लस साइज ब्यूटी पेजेंट फॅशन शो 2026 (सीझन-2) चा ग्रँड फिनाले 17 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडला. देशभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि प्रतिभेचे प्रभावी सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली.


‘कर्वी ग्लॅमर’ या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजसुधारक तथा मेघना चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका मेघना शेंडगे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम बॉलिवूड शैलीत सादर करण्यात आला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश सौंदर्याबरोबर आत्मविश्वासाला प्रोत्साहन देणे, बॉडी शेमिंगविरोधात बॉडी पॉझिटिव्हिटीचा संदेश देणे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते हा सकारात्मक संदेश समाजात पोहोचवणे हा होता.
या स्पर्धेत देशभरातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी दै. मुंबई हलचलचे संपादक दिलशाद एस. खान यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –
मिसेस इंडिया मॉडेल : अर्पिता ठाकुर कोठारी (आर्किटेक्ट)
प्रथम रनरअप : मोनिका तिवारी (शिक्षिका)
द्वितीय रनरअप : दीपाली वसंत (फायनान्शियल अ‍ॅडव्हायझर)
मिस्टर इंडिया मॉडेल : पुष्पक पाटील (कॉमेडी कलाकार)
प्रथम रनरअप : अरविंद कुमार सिन्हा (कंट्री क्लब मॅनेजर)
द्वितीय रनरअप : पंकज शर्मा (फिटनेस ट्रेनर)
मिस इंडिया मॉडेल : सई शेंडगे (हिप-हॉप डान्सर)
प्रथम रनरअप : विभूषा कांदळकर (लावणी नृत्यांगना)
सबटायटल विजेत्यांमध्ये सरिता गुप्ता यांना फोटोजेनिक फेस, रीना सोबती यांना इंटेलेक्च्युअल आयकॉन, अश्विनी जोशी यांना कॉनजेनियलिटी आयकॉन, तर रेश्मी मुन्सी यांना कॉन्फिडेंटल क्वीन हा किताब देण्यात आला.
विजेत्यांना कर्वी ग्लॅमरतर्फे आकर्षक क्राउन, सॅश, ट्रॉफी, सर्टिफिकेट तसेच विविध भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये आर.के. गोल्ड कडून 1 ग्रॅम सोन्याची चेनही देण्यात आली. गिफ्ट पार्टनर म्हणून कपिल सिंह, तर क्राउन पार्टनर म्हणून समीर मेहता यांनी सहकार्य केले.
स्पर्धकांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळाली आणि त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या आयोजन समितीत मॅनेजिंग डायरेक्टर भारत शेंडगे, इन्क्युरमेंट मॅनेजर रेनाल्डो रोजारियो, सेलिब्रिटी ग्रूमर प्रशांत जाधव, मेकअप पार्टनर लेक्मे मालाड वेस्ट, कॉस्च्युम डिझायनर रिया जरसानिया, सतीश नाशित आणि झिनल खान तसेच बिग सपोर्टिंग पार्टनर नेविल करवाना (नेकझेड एंटरप्रायझेस) आणि प्रेझेंट्स विशिक (राहुल शर्मा) यांचा सहभाग होता.
या भव्य कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आशीष शेलार, मुख्यमंत्री पत्नी व गायिका अमृता फडणवीस, माजी मंत्री व आमदार असलम शेख, अभिनेत्री ईशा देओल, अभिनेता गोविंदा तसेच My Friend Ganesha चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव रुईया यांसह अनेक मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते. त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सहकारी, आयोजक आणि सहभागी स्पर्धकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed