आरोपी भगवान रामदास शिंपी वय 60 वर्ष रा. ताडेपुरा, पैलाड, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगांव यांस 07 वर्षे. सश्रम कारावासाची व 2000 रू दंडाची शिक्षा. . जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न प्रकरणात आरोपीस शिक्षा.
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर पो. स्टे. गु.१.न. 476/2023. सेशन केस नं. 28/2024, गुन्हा भा.द.वि. कलम 307, 323, 504, 506 प्रमाणे, सदरचे घटनास्थळ हे मा. न्यायालयाचे स्थलसीमेअंतर्गत असुन सदरचा अपराध दि. 01/11/2023 रोजी सांयकाळी 7.30 वाजेचे सुमारास फिर्यादी ही अमळनेर शहरातील मजुरीची कामे आटोपुन घरी गेली व ती ारात हजर असतांना पती भगवान शिंपी है घरी आले तेव्हा ती फोनवरुन तिची मुलगी रोशनी हिच्याशी फोनवर बोलत होती तेव्हा तिचे पती तिला शिवीगाळ करुन तिच्या चारित्र्यावर संशय धरुन तिला म्हणाला की, तु कोणाशी बोलत आहे.

आज तुला मारुनच टाकतो असे म्हणुन शिविगाळ करत घराबाहेर निघुन गेला तो परत घरी आल्यावर तिच्या जिवाचे बरे वाईट करेन म्हणुन ती तिच्या ओळखीचे पैलाड नाक्यावरील रवि टेलर यांच्या दुकानावर जाउन झालेला प्रकार सांगितला तेव्हा ते बोलले की, आपण सकाळी पाहु तुम्ही घरी जा असे सांगितल्याने मी घरी आली व घरासमोर ओट्यावर बसलेली असताना रात्री 08.00 वा. सुमारास तिचे पती भगवान शिंपी हे घरी आले व तिला पाहुन शिविगाळ करत तिला चापटबुक्यांनी मारहाण करुन तिला खाली जमिनीवर आडवे पाडले व पती यांने त्याच्या पॅन्टच्या खिशातून चाकु सारखे धारदार हत्यार काढुन तिच्या गळ्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करुन तिला पुन्हा चाकुने मारण्याचा प्रयत्न करीत असता ति त्याला हाताने प्रतिकार करुन लोटले तेव्हा झटापटीत ती त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने त्याच्या हातातील चाकुने तिच्या दोन्ही हातावर वार करुन दुखापती केल्या तेव्हा तिचा मुलगा गणेश हा कामावरुन घरी आला व गल्लीतील नाना चौधरी व इतर लोक जमा झाल्याने तो सदर ठिकाणाहुन पळुन गेला तिच्या गळ्यावर मानेवर, हनवटीवर व दोन्ही हातावर धारदार चाकुने वार करुन जखमी केले असल्याने मुलगा गणेश व गल्लीतील इतर लोकांनी तिला मोटर सायकलवर बसवुन ग्रामिण रुग्णालय अमळनेर येथे उपचाराकामी दाखल केले होते

सदरचा खटला कामी मा. जिल्हा न्यायाधीश 1 व अति. सत्र न्यायाधीश श्रीमती, सी. व्ही. पाटील मॅडम यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सरकारी वकील अॅड, के. आर. बागुल मंगरूळकर यांनी एकूण 06 साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी ही आरोपीची पत्नी होती. तिच्यावरच हमला झाल्याने स्वतः उपचार घेत असतांना तिने दिलेला जबाब मा. न्यायालयात पती विरुध्द सांगितला. त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शी पाहणारे साक्षीदार रवि टेलर, ज्ञानेश्वर संतोष, पंच व डॉ. प्रकाश ताडे, अमळनेर ग्रामीण रुग्णालय यांची साक्ष महत्वाची ठरली. फिर्यादीवर चाकूने झालेल्या जखमा मुळे तिला जिवे मारण्याचा उद्देश होता हे मा. न्यायालयात सिध्द झाल्याने याबाबत सरकारी वकील के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्याप्रमाणे आरोपीतास मा. न्यायालयाने दोषी धरून भा.द.वी. कलम 307 प्रमाणे गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने त्यास 07 वर्ष सश्रम कारावास व 2000 रू. दंड अश्याप्रकारची शिक्षा मे न्यायालयाने सुनावली. जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल दोन वर्षे व दंड रक्कम रु.1000 अशी शिक्षा सुनावली. सदरील तपासणी अधिकारी शिरोळे api होते कामकाजात पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, केस वॉच. व पैरवी अधिकारी, पी. एस. आय, उदयसिंग सांळुके पारोळा पो. स्टे पैरवी अधिकारी पो.कों राहुल रणधीर, चोपडा ग्रामीण. पो.स्टे. व पो.हे.कॉ. प्रमोद पाटील, चोपड़ा शहर पो.स्टे.. पो.कॉ. सतीष भोई, अडावद पो.स्टे., व पो.कॉ. भरत इशी, मारवड पो.स्टे. यांनी
