“पोपट शोपीस असतात, आमचे नगरसेवक ढाणे वाघ-वाघिणी आहेत” – सचिन बळवंत पाटील यांचा शिरीष चौधरींवर पलटवार..

0
New-Doc-03-11-2026-10.53.jpg


अमळनेर /आबिद शेख
काल झालेल्या पत्रकार परिषदेत लोकप्रतिनिधींविषयी बोलताना शिरीष चौधरी यांची जीभ घसरल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीचे नगरसेवक सचिन बळवंत पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“आमच्या शहर विकास आघाडीचे नगरसेवक आणि नगरसेविका हे साक्षात ढाणे वाघ आणि वाघिणी आहेत. जे फक्त शोपीस म्हणून ठेवले जातात त्यांना पोपट म्हणतात,” असा टोला त्यांनी लगावला.
पाटील म्हणाले की, जनतेसमोर सत्य यावे म्हणून सभागृहातील प्रत्येक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे. “सभागृहात ढाणे वाघ कोण आहेत आणि पोपट कोण आहेत हे जनतेला दिसू द्या. तुमच्यात हिम्मत असेल तर प्रत्येक सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.


पहिल्याच जनरल मीटिंगमध्ये शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांची जोरदार चिरफाड केल्याचा दावा करत, त्या बैठकीचे शूटिंगचे फुटेज मागणी करूनही देण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. “फुटेज बाहेर येऊ नये म्हणूनच ते देण्यात येत नाही,” असेही ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले की, विधानसभेपासून लोकसभेपर्यंत सर्व ठिकाणी पत्रकारांना सन्मानाने प्रवेश दिला जातो आणि कामकाजाचे थेट प्रक्षेपणही दाखवले जाते. “जर तुमची नीती स्वच्छ असेल आणि तुम्ही भ्रष्ट नसाल, तर पत्रकारांना सभागृहात प्रवेश द्या आणि कामकाजाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवा,” असे आव्हान त्यांनी पुन्हा दिले.
“पत्रकारांना प्रवेश न देणे आणि लाईव्ह प्रक्षेपण टाळणे म्हणजे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न आहे. जनतेसमोर सत्य येऊ द्या, मग कोण खरे आणि कोण खोटे हे स्पष्ट होईल,” असे म्हणत नगरसेवक सचिन पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed