अमळनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नियोजन बैठक संपन्न..

0
New-Doc-03-10-2026-06.57.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर यांच्या वतीने नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.

ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतपेढी, अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत जयंती उत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले.
बैठकीत जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

समाजातील विद्यार्थी, युवक व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा यासाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रेरणादायी व्याख्यानमाला तसेच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या उपक्रमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याच बैठकीत सन २०२६ च्या जयंती उत्सवासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी आयु. विनोद बिऱ्हाडे, उपाध्यक्षपदी गोपीचंद चव्हाण व प्रमोद बिऱ्हाडे, खजिनदारपदी सतीश सोनवणे, तर सेक्रेटरीपदी नरेंद्रभाऊ संदानशिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यंदाची जयंती अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. जयंती उत्सव हा केवळ उत्सव नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये अमळनेर शहरातील नागरिक, युवक, महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेतर्फे करण्यात आले.


या बैठकीस प्रा. विजय तूंटे, प्रा. भानुदास गुलाले, प्रा. जितेश संदानशिव, आयु. गौतम मोरे, आयु. बापू निकम, आयु. अशोक बिऱ्हाडे, आयु. चीधू वानखेडे, प्रा. सुनील वाघमारे, प्रा. कृष्णा संदानशिव, आयु. सुरेश वानखेडे, आयु. ज्ञानेश्वर संदानशिव, आयु. चंद्रकांत संदानशिव, आयु. गोकुळ बिऱ्हाडे, आयु. गोपीचंद चव्हाण, आयु. राहुल संदानशिव, आयु. राजेंद्र संदानशिव, आयु. संजय बिऱ्हाडे, आयु. सिद्धार्थ मोरे, आयु. समाधान बिऱ्हाडे, आयु. दिनेश संदानशिव, आयु. भिका संदानशिव तसेच समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed