जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री सन्मानाचा संदेश. – डॉ. अर्चना सूर्यवंशी
अमळनेर /आबिद शेख
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांना शिक्षण, समान संधी आणि सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

मुलींना योग्य शिक्षण व संधी दिल्यास त्या आत्मविश्वासाने पुढे जातात आणि देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
स्त्री ही धैर्य, प्रेम आणि कर्तृत्वाची ओळख असून तिच्या कर्तृत्वाने समाजाचा मार्ग उजळतो. त्यामुळे स्त्रीला सन्मान देणे, तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच जागतिक महिला दिनानिमित्त समाजात समानतेचा संदेश पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्त्री म्हणजे समाजाचा आधार असून तिच्या स्वप्नांना पंख देणे आणि तिच्या कर्तृत्वाला मान देणे गरजेचे आहे. सशक्त स्त्री आणि सशक्त समाज यातच देशाचा खरा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी या सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा असून त्या पोदार स्कूल, गलवाडे रोड, अमळनेर येथील अध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत.

