भारत–न्यूझीलंड टी-२० फायनलचा थरार मोठ्या LED स्क्रीनवर ग्रीन ग्रुप व पत्रकार संघातर्फे क्रिकेटप्रेमींसाठी विशेष व्यवस्था…

0
New-Doc-03-08-2026-06.40.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (८ मार्च) संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या टी-२० क्रिकेट अंतिम सामन्याचा थरार

अमळनेरमधील क्रिकेटप्रेमींना एकत्रितपणे अनुभवता यावा यासाठी मोठ्या LED स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रीन ग्रुप, अमळनेर तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्यवस्था राज भवन समोर, तहसील कार्यालयाजवळ करण्यात आली आहे.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना असल्याने देशभरातील क्रीडारसिकांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. सामन्यातील प्रत्येक चेंडू, चौकार-षटकार आणि उत्कंठावर्धक क्षण मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. याच पार्श्वभूमीवर अमळनेरमधील क्रिकेटप्रेमींना सामूहिकरीत्या सामना पाहता यावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे शहरातील मित्रमंडळी, तरुणाई व क्रिकेटप्रेमी एकत्र येऊन सामन्याचा आनंद घेऊ शकतील. सामन्यादरम्यान उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून शहरात या उपक्रमाबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
ग्रीन ग्रुप, अमळनेर तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ यांनी शहरातील सर्व क्रिकेटप्रेमींना मोठ्या LED स्क्रीनवर हा रोमांचक सामना पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. एकत्र बसून भारताच्या विजयासाठी जल्लोष करत सामन्याचा आनंद लुटावा, असेही आयोजकांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed