फाफोरे बु येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ संपन्न; ८५० ते ९०० नागरिकांनी घेतला लाभ..
अमळनेर /आबिद शेख
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” दि. ७ मार्च रोजी फाफोरे बु. (मंडळ – शिरूड, ता. अमळनेर) येथे उत्साहात संपन्न झाले.

या शिबीराचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी तसेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरावरील शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांना लाभ देण्यात आला.

शिबिरातील ठळक लाभ पुढीलप्रमाणे :
पुरवठा शाखा: 115 नवीन व दुबार शिधापत्रिका
संजय गांधी योजना शाखा: 147 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, 22 हयात प्रमाणपत्रे, 21 नवीन अर्ज ७/१२ दुरुस्ती: 51 प्रकरणे
वारस नोंदी: 11 फेरफार नोंदी निकाली: 7
सेतु शाखा: 212 उत्पन्न, 61 राष्ट्रीयत्व, 157 रहिवासी, 53 जातीचे दाखले वाटप, 10 आधार नोंदणी, 17 आधार दुरुस्ती
बालविकास विभाग: 4 लाभार्थ्यांना बेबी कीट वाटप
कृषी विभाग: 2 लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल व प्रदर्शनीय टेबलही लावण्यात आले होते, ज्यामधून नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या शिबिराला सुमारे ८५० ते ९०० नागरिकांनी उपस्थिती लावून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी प्रस्तावना मांडली तर निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले
