कसाली मोहल्ल्यातील चिमुकल्यांचा रमजान रोजा. ४ व ५ वर्षांच्या मुलांनी दाखवली श्रद्धा व जिद्द..

अमळनेर /आबिद शेख
पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवणे हे मोठ्यांसाठीही संयम आणि श्रद्धेची कसोटी मानली जाते. मात्र अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यातील दोन चिमुकल्यांनी इतक्या लहान वयात रोजा पूर्ण करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

कसाली मोहल्ल्यातील मा. नगरसेवक शेखा हाजी यांचे नातू हम्माद रजा मोहम्मद गौस (वय ४ वर्ष) आणि नात रिझा शेख तौसिफ (वय ५ वर्ष) यांनी पवित्र रमजान महिन्यात रोजा पूर्ण करत आपल्या श्रद्धेचे अनोखे उदाहरण दाखवले आहे. एवढ्या लहान वयात दिवसभर उपवास ठेवत त्यांनी दाखवलेली जिद्द, संयम आणि धार्मिक भावना पाहून परिसरातील नागरिकही भारावून गेले आहेत.
दोन्ही चिमुकल्यांनी सकाळच्या सहरीपासून संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत रोजा पूर्ण करत मोठ्यांनाही प्रेरणा दिली. त्यांच्या या प्रयत्नाचे कसाली मोहल्ल्यासह संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून अनेकांनी त्यांना आशीर्वाद देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रमजान हा संयम, दया आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. अशा पवित्र महिन्यात इतक्या लहान वयात रोजा पूर्ण करून या चिमुकल्यांनी श्रद्धा आणि धार्मिक संस्कारांचे सुंदर उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यामुळे परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..

