संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज निमित्त पालखी मिरवणुकीचे दगडी दरवाजा जवळ जल्लोषात स्वागत..

0
New-Doc-03-06-2026-23.39.jpg


अमळनेर : आबिद शेख
सालाबादाप्रमाणे यावर्षीही कुणबी पाटील समाजाच्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज निमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील दगडी दरवाजा परिसरात राजे संभाजी व शिवशक्ती मित्र परिवाराच्या वतीने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.


या वेळी फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक व समाजबांधव उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेत होते.
या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, शिवसेना गटनेते पंकज चौधरी, अपक्ष गटनेते महेशबापू देशमुख, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रशांत निकम, नगरसेवक कैलासतात्या पाटील, तुळशीराम हटकर, भरत परदेशी, बाळू पाटील, नविद शेख, प्रतापअण्णा साळी आदी मान्यवरांनी राजे संभाजी चौक येथे भेट देत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कुणबी पाटील समाज बांधव व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी तेली पंच मंडळाचे परागभाऊ चौधरी, बापू चौधरी, कुणबी पाटील समाजाचे पंच ब्रिजलाल भाऊ पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, सुनिल अहिरराव, स्वामी चौधरी, रुणाल पाटील, आकाश अहिरराव, निलेश अहिरराव, भूषण अहिरराव, रोहित अहिरराव, हितेश देसले, समर्थ येवले, राहुल मराठे, प्रशांत पाटील यांच्यासह राजे संभाजी व शिवशक्ती चौक मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमात भक्तीमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed