अर्थसंकल्पात अमळनेर मतदारसंघावर 25 कोटींची विकासकामांची बरसात. – आ. अनिल पाटील. महत्वाच्या रस्त्यांसह विविध विकासकामांना गती..

अमळनेर /आबिद शेख
महाराष्ट्र शासनाच्या मार्च 2026-27 च्या अर्थसंकल्पात अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून मतदारसंघातील महत्वाचे रस्ते तसेच विविध विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून गेल्या काही वर्षांत अमळनेर मतदारसंघात विकासकामांना मोठी चालना मिळाली आहे. रस्ते, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण भागातील विविध कामे पूर्णत्वास जात असून अनेक कामे सध्या वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.

या विकासकामांमुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, चालू अर्थसंकल्पातही आमदार अनिल पाटील यांनी सुमारे 25 कोटी रुपयांचा भरीव निधी आणण्यात यश मिळविल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या विकासकामांसाठी निधी मंजूर
अर्थसंकल्पातून अमळनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या सुधारणा व मजबुतीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन राज्य महामार्ग क्र. 15 या रस्त्याच्या कि.मी. 67/00 ते 68/500, 71/750 ते 72/740 आणि 73/500 ते 76/200 या टप्प्यात सुधारणा करण्यासाठी (रेल्वे उड्डाणपूल ते दहिवद फाटा) 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मुसळी फाटा-धरणगाव-अमळनेर-शिंदखेडा राज्य महामार्ग क्र. 6 या रस्त्याच्या कि.मी. 51/000 व 57/200 (भरवस ते रेल्वे बोगदा) या भागासाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच रा.मा. 39 ते जांभोरा-ढेकू-हेडावे-अमळनेर-शिरसाळे-वावडे-मांडळ या प्रजिमा 51 रस्त्याच्या कि.मी. 29/600 ते 37/500 (शिरसाळे ते वावडे) या भागासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
बोळे-मोंढाळे-फाफोरे-अमळनेर-मारवड-निंम-कपिलेश्वर या प्रजिमा 49 रस्त्याच्या विविध टप्प्यांवरील सुधारणा व मजबुतीकरणासाठी एकूण सुमारे 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये कळमसरे ते निंम, धार ते मारवड, अमळनेर ते धार तसेच रुबजी नगर ते हिंगोणा या भागांचा समावेश आहे.
या शिवाय
चोपडा-चुंचाळे-चौगाव-लासूर-कलाली-निंभोरा-पिंगळवाडे-नंदगाव प्रजिमा-03 रस्त्यावर निंभोरा ते पिंगळवाडे गावांदरम्यान चिखली नदीवरील पुलासाठी पोहोच रस्ता करण्यासाठी

2.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच बोळे-मोंढाळे-बहादरपूर-फाफोरे-अमळनेर-मारवड-निंम-कपिलेश्वर रस्त्याच्या पारोळा तालुक्यातील कि.मी. 15/00 ते 17/800 या भागासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
मान्यवरांचे मानले आभार
या निधीमुळे मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती सुधारून वाहतूक सुलभ होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. तसेच या निधीसाठी त्यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, Sunetra Pawar, ग्रामविकास मंत्री Girish Mahajan तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री Gulabrao Patil यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या निधीमुळे अमळनेर मतदारसंघातील रस्ते व पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
