लालबाग पाणीटाकी परिसरात घाणीचे साम्राज्य; मच्छी मार्केटजवळ दुर्गंधीचा कहर, नगरपालिकेचे दुर्लक्ष!

0
New-Doc-03-06-2026-12.34.jpg


अमळनेर | आबिद शेख
अमळनेर शहरातील लालबाग पाणी पिण्याच्या टाकीजवळ तसेच मच्छी मार्केट परिसरात सध्या घाणीचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले असून सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

अनेक दिवसांपासून या ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपालिकेच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


स्थानिक दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, मच्छी मार्केटजवळ कचरा व सांडपाणी साचल्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढत असताना नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या अस्वच्छतेमुळे माशा, डास आणि जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून व्यापारी व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे लालबाग पाणीटाकी व मच्छी मार्केट परिसरातील कचरा तातडीने उचलून नियमित साफसफाई करण्याची मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed