अमलनेरमध्ये नवीन शहर काझीची नियुक्ती जाहीरईदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट यांच्या वतीने..

आबिद शेख/अमळनेर अमलनेर शहरातील मुस्लिम बांधवांना कळविण्यात आले आहे की दि. २ मार्च २०२६ (सोमवार) रोजी ट्रस्टची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहर काझी पदाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
ट्रस्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माजी शहर काझी मौलाना नौशाद आलम यांनी दि. २८ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी ट्रस्टच्या विश्वस्तांकडे आपला राजीनामा सादर केला होता. संबंधित राजीनामा विश्वस्तांनी स्वीकारल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

यानंतर सर्व उपस्थित विश्वस्तांच्या एकमताने अमलनेर शहरासाठी नवीन शहर काझी म्हणून हाफिज व कारी मौलाना अझहर नुरी (खतीब व इमाम, मस्जिद या रसूल अल्लाह, बारी प्लॉट, कसाली मोहल्ला, अमलनेर) यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. हा निर्णय एकमताने व अंतिम स्वरूपात घेण्यात आल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
ट्रस्टच्या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या निर्णयात कोणत्याही व्यक्तीने हस्तक्षेप करू नये. अन्यथा ट्रस्टच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अमलनेर शहरातील मुस्लिम समाजाने या निर्णयाची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष यांनी केले आहे.
