अमळनेरातील सराफ–कोठारी परिवारातील ज्येष्ठ सदस्या इन्द्रकलाबाई सराफ यांचे निधन..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : येथील सराफ–कोठारी परिवारातील ज्येष्ठ सदस्या, अखंड सौभाग्यवती श्रीमती


इन्द्रकलाबाई जयंतीलालजी सराफ (वय 83, रा. नाशिक) यांचे दिनांक २ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले.
त्या श्री जयंतदादा सराफ यांच्या धर्मपत्नी होत. तसेच घेवरचंद रमेशचंद उत्तमचंद कोठारी व उज्वल भरत, ललित कुमारपाल, प्रितेश, योगेश, कल्पेश कोठारी परिवाराच्या त्या बुआजी होत. त्यांच्या निधनामुळे सराफ–कोठारी परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
“आत्मा अजर-अमर आहे, शरीर नश्वर आहे,” या भावनेतून परिवारियांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. ईश्वराने दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणी स्थान द्यावे व परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.
उठावना
बुधवार, ४ मार्च २०२६
सकाळी १०:१५ वाजता
श्री शीतलनाथ जैन मंदिर, न्यू प्लॉट, अमळनेर
निवासस्थान : वर्धमान झेरॉक्स, न्यू प्लॉट, अमळनेर
शोकाकुल – कोठारी परिवार, अमळनेर
