अमळनेरात शाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार व संवाद कार्यक्रम..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून सातारा येथे संयोजित विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेर येथे जाहीर सत्कार व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नांदेडकर सभागृह, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर येथे होणार आहे. अमळनेर परिसरातील समानता, मानवता, अहिंसा व संविधान मूल्ये मानणाऱ्या विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच व्यक्तींच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात शाहीर संभाजी भगत यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधीही उपस्थितांना मिळणार असून, विद्रोही साहित्य चळवळ, सामाजिक परिवर्तन आणि संविधानवादी विचार यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम स्थळ : ‘मुक्ताई’, धुळे रोड, अमळनेर, जि. जळगाव – ४२५४०१
संपर्क : ९४२१७०२८४१ / ९४२२२७८४१९ / ९४२२७९०६१० / ९०७५५७०५१०
ई-मेल : saneguruji2007kspa@gmail.com | sanegurujikspa@gmail.com
“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” आणि “बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

