इंदौर किंग फारूक बागवान चालक सेवानिवृत्त..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर आगारातील चालक फारूक हाजी गुलाब बागवान हे एस टी महामंडळाच्या प्रदीर्घ सेवेतून सुखरूप सेवानिवृत्त झाले आपल्या सेवाकाळात त्यांनी नासिक व जळगाव विभागातून सेवा केली नासिक येथे असताना कुंभमेळ्यात विशेष सेवा केलेली आहे

सेवाकाळात ते नेहमीच प्रवाशी बांधवाना सुरक्षित सुखकर व वेळेवर सेवा देत असल्याने ते प्रवाश्यांच्या मध्ये लोकप्रिय होते त्यांनी आपल्या सेवा काळात लांबपल्ल्याच्या कामगिरी पार पाडलेल्या आहेत विशेष करून अमळनेर इंदौर ड्यूटी जास्त करीत असल्याने डेपोत सहकारी व प्रवाशी त्यांना प्रेमाने इंदौर किंग म्हणत असत
त्यांना सेवानिवृत्ति निमित्त खासदार स्मिता ताई वाघ महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे सरचिटणीस हीरेनजी रेडकर उपाध्यक्ष किरण बिडवे राज्यचिटणीस आर के पाटील जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक दिलीप बंजारा अंमळनेर आगाराचे आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी स्थानक प्रमुख अनिकेत नायदे कामगार सेनेचे अंमळनेर आगाराचे अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी कर्मचारी बांधव यांनी तसेच समाज बांधव यांनी सेवानिवृत्ती निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
