अमळनेर मध्ये आदिवासी ठाकूर समाजाचा पारंपरिक शिमगा उत्सव उत्साहात सुरू..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर येथील आदिवासी ठाकूर जमातीतील महिलांनी पारंपरिक पद्धतीने विधिवत होळी पेटवून कुटुंब व समाजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करत शिमगा उत्सवाला उत्साहात सुरुवात केली. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीत हा पारंपरिक सोहळा पार पडला.

ठाकूर समाजाच्या होळीत उंबराचा दांडा उभा करून होळी रचण्याची विशेष परंपरा आजही जपली जाते. शहरात वास्तव्यास असूनही पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीचे जतन ठाकूर समाजाकडून केले जात आहे. वर्षानुवर्षे सामूहिक पद्धतीने होळी साजरी करण्याची प्रथा अमळनेरमध्ये जोपासली जात आहे.
टाऊन हॉल मैदान, अमळनेर येथे ‘होळी रे होळी’च्या गजरात महिला मंडळातर्फे होळीला खण व नारळ अर्पण करण्यात आले. रंगीत पताका, फुगे आणि आकर्षक रांगोळीने होळीचा परिसर सजविण्यात आला होता.
महिला प्रमुख मिनाताई ठाकूर, कोषाध्यक्ष अपेक्षा पवार, उपाध्यक्ष बेबीताई ठाकूर, सौ. हिराबाई ठाकूर यांच्यासह महिलांनी ओटी व नैवेद्य अर्पण करून विधिवत पूजा केली आणि होळीला अग्नी दिला.

यावेळी समाजाचे अमळनेर जमात प्रमुख दिलीप ठाकूर, राज्य सरचिटणीस तथा अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, सचिव प्रकाश वाघ, गुणवंत वाघ, दिलीप वानखेडे, चंद्रशेखर ठाकूर, अरुण चव्हाण, मच्छिंद्र बागुल, अनिल ठाकूर, धनराज ठाकूर, प्रकाश ठाकूर, लीलाधर ठाकूर आदींनी हार, कंगन व पुष्प अर्पण करून पूजन केले.
आदिवासी ठाकूर समाजात पाच दिवसीय शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा असून समाजबांधव व भगिनींनी होळीच्या अग्नीभोवती फेर धरला. उपस्थितांना प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी वाटप करण्यात आली.
या सोहळ्यास यशवंत सूर्यवंशी, देविदास ठाकूर, कुणाल ठाकूर, हेमंत ठाकूर, विजय ठाकूर, वामन चव्हाण, भैया ठाकूर, वेलचंद ठाकूर, उमाकांत ठाकूर, संजय सूर्यवंशी, सतीश ठाकूर, गजानन ठाकूर, सचिन ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, तेजपाल ठाकूर, उमेश शंकपाळ, काशिनाथ ठाकूर, शुभम ठाकूर, राजेंद्र ठाकूर, सुरज ठाकूर, मनोज ठाकूर, दीपक देविदास ठाकूर, ऋषिकेश ठाकूर, अजय ठाकूर, मुकेश महाले, रोहित ठाकूर तसेच महिला मंडळातील आशा ठाकूर, भारती ठाकूर, संगीता ठाकूर, स्वाती ठाकूर, प्रियंका ठाकूर, मनीषा ठाकूर, मंगल ठाकूर, रुपाली ठाकूर, दिपाली ठाकूर, कल्पना ठाकूर, गायत्री ठाकूर, वर्षा पवार, प्रतिभा पवार, दुर्गा सूर्यवंशी, शांताबाई पवार, पल्लवी ठाकूर, नेहा ठाकूर, रत्नप्रभा ठाकूर, तेजस्विनी ठाकूर, स्नेहा ठाकूर, विजया ठाकूर, मिना ठाकूर, मंगला ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने बाळगोपाळ उपस्थित होते.
टाऊन हॉल परिसरातील रहिवाशांनीही होळीचे पूजन करून उत्सवात सहभाग नोंदविला.
