अंमळनेरचा भूमिपुत्र सीए राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचा उपाध्यक्ष!
आबिद शेख/अमळनेर


अंमळनेर येथील श्री बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचे सुपुत्र सीए राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल यांची दिनांक 2 मार्च 2026 रोजी पुणे येथील ख्यातनाम संस्था शिक्षण प्रसारक मंडळी पुणेच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या संस्थे अंतर्गत एस पी कॉलेज पुणे, रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई,
रा.मा.पोद्दार महाविद्यालय मुंबई, वेलिगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई तसेच इतर 16 शिक्षण शाखा आहेत. अंमळनेरचा भूमिपुत्राची पुण्याच्या ख्यातनाम संस्था शिक्षण प्रसारक मंडळी पुणेच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड होणे ही सर्व अंमळनेरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

श्री राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल यांची शिक्षण प्रसारक मंडळच्या नियमक मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
