सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला नागरिक संघ अमळनेर आयोजित व्यसनमुक्ती घोषवाक्य स्पर्धा..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर नगरीत प्रथमतः सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला नागरिक संघ यांच्या मार्फत फक्त महिला साठी घोषवाक्य स्पर्धा लेखी स्वरूपात आयोजित करण्यात आली होती क्रांतीपर्व स्मारक ढेकूरोड अमळनेर या ठिकाणी घेण्यात आली

मराठी व हिंदी भाषेतून व्यसनमुक्ती घोषवाक्य लिहून घेण्यात आले सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला नागरिक संघाचे अध्यक्ष व कार्यकारिणी , स्पर्धक यांनी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन करून स्पर्धा सुरू करण्यात आली या स्पर्धेत 35 वर्ष व त्यापुढील 25 महिलांना भाग घेतला स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारिणी संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले..
