अजित पवारांचा महाराष्ट्रातील पहिला पुतळा अमळनेर कृउबात उभारणार सभापती अशोक पाटील यांची माहिती; वार्षिक सभेत शेतकरी सन्मान व विकासकामांचे उद्घाटन..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे अमळनेरशी विकासाचे विशेष नाते राहिले आहे. आमदार Anil Patil, माजी आमदार Sahebrao Patil तसेच माजी नगराध्यक्ष स्व. Suresh Lalwani यांच्या माध्यमातून अमळनेरच्या विकासाला गती मिळाली.

याच पार्श्वभूमीवर येत्या मार्च महिन्यात बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृउबा आवारात अजित पवार यांचा शेतकरी रूपातील महाराष्ट्रातील पहिला पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी दिली.
बोनस मधून शेतकऱ्यांचा सन्मान
आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार Smita Wagh, उपसभापती, संचालक मंडळ, व्यापारी, सचिव, कर्मचारी, हमाल, मापाडी व गुमास्ता यांच्या सहकार्याने अमळनेर बाजार समितीने प्रगतीची मोठी झेप घेतली आहे.
शिस्त व पारदर्शक कारभारामुळे बाजार समितीत आवक वाढली असून समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.

प्रवेश सुरु 2026-27 साठी
पणन विभागाच्या कर्जाची नियमित परतफेड, सुपरव्हिजन फी व अंशदान वेळेत भरल्यामुळे समितीला व्याजाच्या ५ टक्के प्रमाणे सुमारे ६ लाखांचा बोनस मिळाला आहे. या निधीतून वार्षिक सभेत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही सभापती पाटील यांनी सांगितले.
विकासकामांचे उद्घाटन
बाजार समिती आवारात सुरू असलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटनही यावेळी होणार आहे :
१३६ दुकान गाळ्यांचे बांधकाम
नवीन लेखापाल कार्यालय
पातोंडा उपबाजारात वे-ब्रिज उभारणी
समितीच्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन
मारवड उपबाजारात संरक्षक भिंत
नवीन प्रकल्पांचे भूमिपूजन
यासोबतच पुढील कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे :
शेतकरी भवन
हमाल-मापाडी भवन
व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज २०० फूट शेड
तसेच उन्हाळ्यात लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत थंड पेय, तर हिवाळा व पावसाळ्यात मोफत चहा उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे.
“ज्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या जीवावर बाजार समिती चालते, त्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान वार्षिक सभेत करण्यात येईल,” असे सभापती अशोक पाटील यांनी स्पष्ट केले.

