स्कुटीवर बसवून फसवणूक; सडावण येथील व्यक्तीचे सुमारे ₹१.१२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास..

0
New-Doc-02-23-2026-09.36.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : स्कुटीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने सडावण येथील नितीन विश्वास पाटील यांना अर्ध्या रस्त्यात उतरवून त्यांच्या जवळील सुमारे १ लाख १२ हजार ६७७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना पारोळा रस्त्यावर मका फॅक्टरीजवळ घडली.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नितीन पाटील हे १२ जानेवारी रोजी बाजारासाठी अमळनेर येथे आले होते. त्यावेळी त्यांचे काका मच्छीन्द्र रावण पाटील यांनी औषधांसाठी पैसे मागितल्याने नितीन यांनी ‘जय भोले कोल्ड्रिंक्स’ येथे चांदीची अंगठी ५० रुपयांत गहाण ठेवली होती.
दरम्यान, १४ जानेवारी रोजी त्यांनी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमधून १५.८७ ग्रॅम वजनाचे, सुमारे ₹१,१२,६७७ किमतीचे सोन्याचे दागिने काढून खिशात ठेवले. सायंकाळी गहाण ठेवलेली अंगठी परत घेण्यासाठी जात असताना एका बिना नंबरच्या स्कुटी चालकाने पारोळा येथे सोडण्याची ऑफर दिली.
विश्वास ठेवून नितीन पाटील स्कुटीवर बसले. मात्र पारोळा रस्त्यावर मका फॅक्टरीजवळ स्कुटी थांबल्यानंतर त्यांच्या खिशातील झुमके व पोत असा सोन्याचा ऐवज गायब झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत अज्ञात आरोपी स्कुटीसह फरार झाला होता.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शरद काकळी पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed