अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत यश संपादन केलेल्या मुस्लिम नगरसेवकांचा ईदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट, अमळनेर तर्फे सत्कार करण्यात आला.
आबिद शेख/अमळनेर शहरातील ईदगाह ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान नसिरुद्दीन हाजी यांनी नगरसेवक नाविद शेख यांचा सत्कार केला. तसेच अल्मास मॅडम यांच्या हस्ते नगरसेविका जुबेदा बी यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर नगरसेविका इर्शाद तडवी यांचा सत्कार जुबेदा बी यांनी केला. हाजी मुजफ्फर हाजी यांनी नासिरोदिन हाजी यांचा सत्कार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुख्तार खाटीक यांचा सत्कार हाजी शब्बीर पैलवान यांच्या हस्ते करण्यात आला. रियाज मौलाना यांनी पप्पू तडवी यांचा सत्कार केला, तर माजी नगरसेवक फिरोज पठाण यांचाही सत्कार शब्बीर पैलवान यांनी केला.
यावेळी नगरसेवक नाविद शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपल्या आशीर्वादामुळे मी निवडून आलो आहे. माझ्या स्तरावर जे काही काम होईल त्याचा पूर्ण पाठपुरावा करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.”
नगरसेविका हज्जन जुबेदा बी यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “महिला सक्षमीकरणासाठी पूर्वीप्रमाणेच प्रयत्न सुरू ठेवू. सर्व वॉर्डमधील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी मी कटिबद्ध आहे.”
नासिर हाजी यांनी आपल्या भाषणात नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडून कार्यक्षम कामाची अपेक्षा व्यक्त केली. तसेच गोरगरिबांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
या कार्यक्रमास नगरसेवक नाविद शेख, मुख्तार खाटीक, हाजी नासिरोदिन, आमीन तडवी, नगरसेविका हज्जन जुबेदा बी, सुलतानाबी, इर्शाद तडवी, रॉयल उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका अल्मास मॅडम, आफ्रिन मॅडम यांच्यासह शब्बीर पैलवान, ताहेर हाजी, हाजी सलीम बागवान, अॅड. रज्जाक शेख, मुस्ताक मुजावर, अखलाख मौलाना, सैय्यद मुजफ्फर अली, शेख इकबाल, मुख्तार अली, आरिफ बाया, जाकीर मेवती, हाजी डबीर पठाण, एतेशाम खान आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
