अमळनेरात अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना निवेदन..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरात उभारण्यात येत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी

आमदार अनिल पाटील यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी अजितदादा पवार यांनी विविध महत्त्वाच्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. महसूल इमारत, प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती इमारत, एसटी कार्यशाळा तसेच निम्न तापी प्रकल्पांतर्गत पाडळसरे धरण या महत्त्वाच्या विकासकामांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या योगदानाची नोंद म्हणून नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाहेर त्यांचे स्मारक अथवा पुतळा उभारण्यात यावा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यासाठी खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सामूहिक पातळीवर पुढाकार घेऊन आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम, इम्रान खाटीक, आलिम मुजावर, सचिन पाटील, राहुल गोत्राळ, कैलास पाटील, गोविंदा बाविस्कर, निलेश देशमुख, अर्षद खाटीक, भूषण पाटील, अनिल शिसोदे, सुलतान खाटीक, मधुकर पाटील, महेंद्र पाटील, अलीम मुजावर, किशोर देसले, जाकीर खाटीक, निखिल पाटील, पंकज जैन, जे. व्ही. बाविस्कर, एन. जे. पाटील, एस. जी. बत्तीसे, एस. आर. शिंगाणे, चेतन बोरसे, भैय्या वाघ, बाबा खाटीक, गौरव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
