लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये दणदणीत गौरव..

0
New-Doc-02-16-2026-21.31.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – Lions Clubs International अंतर्गत कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा धुळे येथे पार पडलेल्या रीजन कॉन्फरन्समध्ये उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल भव्य सन्मान करण्यात आला. १४ फेब्रुवारी रोजी

आयोजित या कॉन्फरन्समध्ये क्लबला तब्बल १३ ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत क्लबची ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून निवड करण्यात आल्याने सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी क्लबने ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून अवयवदान जनजागृती मोहिमेवर विशेष भर दिला. अवयवदान पोस्टर प्रकाशन, गणेशोत्सव काळातील जनजागृती अभियान अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यात मोठी मदत झाली. या मोहिमेचा प्रभाव म्हणून लायन्स सदस्य महावीर पहाडे यांनी आपल्या मातोश्री कांताबेन पहाडे यांचे देहदान जाहीर केले. या कार्याची माध्यमांमधून व्यापक दखल घेतली गेल्याने आतापर्यंत ८ नागरिकांनी देहदानासाठी नोंदणी फॉर्म भरले असल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय क्लबतर्फे खालील महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आले:
मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण शिबिर
वासरे गावातील पूरग्रस्तांसाठी अन्नदान
बसपास अभावी शिक्षण सोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या साने गुरुजी शाळेतील विद्यार्थ्याला वर्षभरासाठी दत्तक सहाय्य
या सर्व उपक्रमांमुळे क्लबला एकूण १३ पुरस्कार प्राप्त झाले.
या प्रसंगी ज्येष्ठ लायन्स सदस्य बजरंग अग्रवाल, योगेश मुंदडा, डॉ. युसूफ पटेल, विनोद अग्रवाल व डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचा विशेष ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
कॉन्फरन्सला रीजन चेअरमन Ln चेतनभाई बर्दिया, डीजी Ln अश्विनजी बजोरिया, पीडीजी Ln गिरीशभाई शिसोदिया तसेच प्रमुख पाहुणे Ln गिरीशभाई मालपानी उपस्थित होते.
कार्यक्रमास क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विचुरकर यांच्यासह बजरंग अग्रवाल, योगेश मुंदडा, विनोद अग्रवाल, एस.डी. भरुचा, प्रदीप जैन, सुनील चौधरी, शेखर धनगर, जितेंद्र जैन, अभिषेक जैन, युसूफ पटेल, हरिओम सोनी, दिनेश मणियार, कमलेश भंडारी, प्रकाश जैन आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष डॉ. संदीप जोशी म्हणाले,
“हे यश कोणत्याही एकाच व्यक्तीचे नसून सर्व सदस्यांच्या एकजुटीचे, टीमवर्कचे आणि समर्पणाचे फलित आहे. वर्षभर राबविलेल्या प्रत्येक प्रकल्पाचा हा सन्मान आहे.”
सेवाभाव, उत्कृष्ट समन्वय व सक्रिय सहभाग यांचे प्रतिबिंब या सन्मानातून उमटले असून,
“Together We Serve – Together We Win” या ब्रीदवाक्यानुसार पुढील वाटचालीत आणखी मोठी यशे संपादन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed