फरांदे पार्क येथे महाशिवरात्री निमित्त शिव ध्वजारोहण व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

0
New-Doc-02-16-2026-15.36.jpg

24 प्राईम न्यूज 16 Feb 2026
फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय मध्ये महाशिवरात्री निमित्त विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिव ध्वजारोहण, ज्योतिर्लिंग दर्शन तसेच आरोग्य तपासणी शिबिराचा समावेश होता.
कार्यक्रमास राजयोगिनी अनिता दिदी (संचालिका), अष्टविनायक हॉस्पिटलचे डॉ. साईबाबा अंकुशकर (एम.डी. मेडिसिन), बी.के. सत्यादिदी तसेच डॉ. बी.के. रामरावजी जाधव भाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात शिव ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना आध्यात्मिक शपथ देण्यात आली. पुढे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. अंकुशकर व त्यांच्या टीमने नागरिकांची विविध वैद्यकीय तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी बी.के. अनिता दिदी व बी.के. सत्यादिदी यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी.के. जाधव भाई यांनी केले. या उपक्रमास ब्रह्माकुमारीजचे भाई-बहिणी तसेच फरांदे पार्क परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed