व्हॅलेंटाईन डेऐवजी अमळनेरमध्ये ‘काळा दिवस’; पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली..

0
New-Doc-02-15-2026-07.09.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील तिरंगा चौक येथे खान्देशी रक्षक संघटना, आजी-माजी सैनिक संघटना तसेच वीर नारी महिला मंडळ यांच्या वतीने व्हॅलेंटाईन डे साजरा न करता ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. यावेळी तरुण पिढीला देशप्रेमाचा संदेश देत पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


कार्यक्रमस्थळी अमर जवानांचे तात्पुरते स्मारक उभारण्यात आले होते. देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून परिसरात राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित महिला मंडळाच्या आवाजात सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाकडून पीआय दत्तात्रय निकम उपस्थित होते. तसेच पत्रकार जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, नानाभाऊ धनगर यांच्यासह शहरातील असंख्य नागरिक, महिला आणि तालुक्यातील खान्देशी रक्षक संघटना व आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये शिवदास शेटे, ईश्वर चौधरी, लक्ष्मण बोढरे, जयदीप राजपूत, जगदीश पाटील, नरेंद्र पाटील, नामदेव यादव, हेमंत पाटील, आत्माराम बडगुजर, सोपान महाले, नितीन देवरे आदींचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान्देश रक्षक संघटनेचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांविषयी माहिती देत उपस्थितांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे आभार धनराज पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed