अमळनेरात जेसीबीने भाडेकरूचे घर जमीनदोस्त; बिल्डर सरजू गोकलानीसह ५–६ जणांवर गुन्हा दाखल…

0
New-Doc-02-12-2026-21.26.jpg


अमळनेर /आबिद शेख
शहरातील न्यू प्लॉट परिसरात ७५ ते ८० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरू कुटुंबाचे घर कोणतीही पूर्वसूचना अथवा संमती न घेता

जेसीबीच्या साहाय्याने पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नामांकित बिल्डर सरजू गोकलानी यांच्यासह ५ ते ६ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू प्लॉट भागातील देशमुख चाळ, टी.पी. नंबर ४५/०१ येथे शरद जाधवराव शिंदे यांचे दोन रूमचे लोखंडी पत्र्याचे भाड्याचे घर आहे. सदर घरात त्यांच्या कुटुंबाचा तब्बल ७५ ते ८० वर्षांपासून रहिवास असून वीज व नळ कनेक्शनही त्यांच्या नावावर आहे.

HM MOTERS
इलेक्ट्रिक्क दु-हीलर विक्री व सर्विस
शोरुम चा भव्य उद्घाटन समारोह
वेळ : आज संध्याकाळी 5 वाजता
भारत गाडी भंडार जवळ, धुळे रोड, अमळनेर
संपर्क : 8830471826


दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास, शिंदे कुटुंबाची कोणतीही संमती न घेता बिल्डर सरजू गोकलानी यांच्या सांगण्यावरून ४ ते ५ इसम तसेच महेश देशमुख (रा. अमळनेर) यांनी घरात जबरदस्ती प्रवेश केला. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण घर पाडून जमीनदोस्त करण्यात आले.
या घटनेत घरातील लोखंडी गोदरेज कपाट, लोखंडी रॅक, स्टील रॅक, गॅसची स्टील शेगडी, कुलर, दोन पंखे आदी मिळून अंदाजे २० हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधितांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी शरद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरजू गोकलानी, त्यांचे ४ ते ५ साथीदार व महेश देशमुख यांच्या विरोधात भादंवि कलम ३२९(३), ३२९(४), ३२४(४), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे करीत आहेत.
दरम्यान, शहरातील भाडेकरूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed