साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील ५५ वर्षांच्या सेवेला सलाम. रोटरी क्लब चोपडा तर्फे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष पाटील यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान..

0
New-Doc-02-10-2026-22.53.jpg


24 प्राईम न्यूज 11 Feb 2026
साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ५५ वर्षे निष्ठेने कार्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सुभाष पाटील यांना रोटरी क्लब चोपडा यांच्यातर्फे

नुकताच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा गौरव सोहळा अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा तहसीलदार मा. थोरात साहेब होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष नम्रता पाटील, रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुभाष पाटील यांनी आपल्या दीर्घ कार्यकाळात साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले तसेच पत्रकारितेतून सत्य, निर्भीड व जनहिताच्या बातम्या मांडत पत्रकारितेची विश्वासार्हता जपली. ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय, सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळी यांना त्यांनी आपल्या लेखणीतून नेहमीच प्राधान्य दिले.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की,
“सुभाष पाटील यांचे कार्य हे केवळ चोपडा तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. ५५ वर्षांचा त्यांचा साहित्य व पत्रकारितेतील प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
आपल्या सत्काराला उत्तर देताना सुभाष पाटील म्हणाले की,
“पत्रकारिता व साहित्य ही माझ्यासाठी केवळ काम नव्हे तर समाजसेवेचे साधन राहिले आहे. रोटरी क्लब चोपडाने दिलेला हा जीवनगौरव पुरस्कार माझ्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान क्षण आहे.”
या गौरवामुळे चोपडा व अमळनेर तालुक्यातील साहित्यिक, पत्रकार व वाचक वर्गातून सुभाष पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 160000

22 Ct सोने 91.60% : ₹. 147200

18 Ct सोने 75.00% : ₹. 121600

शुद्ध चांदी 999%:₹. 2680/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed