खान्देश प्रीमियर लीग 2026 चे दिमाखदार आयोजन; 19 ते 29 मार्चदरम्यान अमळनेरमध्ये क्रिकेटची रणधुमाळी..
अमळनेर /आबिद शेख खान्देशातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणारी खान्देश प्रीमियर लीग 2026 (KPL) ही भव्य क्रिकेट स्पर्धा येत्या 19 ते 29 मार्च 2026 या

कालावधीत अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे. खान्देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळख मिळवलेल्या या लीगचा अंतिम सामना 29 मार्च रोजी रंगणार असून या स्पर्धेला राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तालुका क्रीडा संकुल, अमळनेर (जि. जळगाव) येथे सर्व सामने खेळविण्यात येणार असून स्पर्धा 10-10 षटकांच्या स्वरूपात पार पडणार आहे. संपूर्ण भारतातून संघांना सहभागाची संधी देण्यात आली असून उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा
स्पर्धेत विजेत्या संघासाठी आकर्षक बक्षिसांची लयलूट जाहीर करण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक – ₹1,00,000
賂 द्वितीय क्रमांक – ₹51,000
雷 तृतीय क्रमांक – ₹31,000
स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क ₹21,000 निश्चित करण्यात आले असून संघांनी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आधार कार्ड अनिवार्य राहणार आहे.
नियम व अटी
आयोजकांच्या माहितीनुसार, पंच व स्पर्धा समितीचा निर्णय अंतिम राहील. खेळादरम्यान झालेल्या कोणत्याही दुखापतीस खेळाडू स्वतः जबाबदार राहतील. तसेच मैदानावर किंवा स्पर्धेदरम्यान गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संपर्कासाठी
स्पर्धेबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा –
9579764004 / 9145442324
खान्देशातील क्रिकेटला नवी दिशा देणारी ही लीग ठरणार असल्याने परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर संघांचा सहभाग अपेक्षित आहे.
