धावत्या रेल्वेमधून प्रवाशांची बॅग लंपास करणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद..

0
New-Doc-02-10-2026-10.01.jpg


जळगाव | प्रतिनिधी :
धावत्या रेल्वेमधून प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे.


दिनांक ०८/०२/२०२६ रोजी आनंद मोर्या (रा. अयोध्या) हे झेलम एक्सप्रेसने प्रवास करीत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान धावत्या रेल्वेमधून अज्ञात इसमाने त्यांची बॅग चोरी केली होती. सदर बॅगेत अंदाजे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने होते. या घटनेबाबत फिर्यादी आनंद मोर्या यांनी इटारसी रेल्वे पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार पुढील तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यास वर्ग करण्यात आली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान सदर गुन्हा हा जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार
१) समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (वय २१), रा. फातेमा नगर, अल्फरा मशीद जवळ, जळगाव
२) सोनू जयसिंग बागडे, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव
यांनी केल्याबाबत खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदारांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. आदेशानुसार पथकाने गोपनीय माहिती व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने फातेमा नगर, जळगाव येथून आरोपी समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन यास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा हा आपल्या साथीदारासह केल्याची कबुली दिली.
त्यानंतर आरोपीस भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकाकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच पोलीस अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed