सिटी लाईट पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; रमजानपूर्वी तातडीने व्यवस्था करण्याची मागणी..

0
New-Doc-02-08-2026-11.26.jpg


नंदुरबार (प्रतिनिधी):
शहरातील सिटी लाईट पार्क परिसरात (जनसेवा मंडळ भिंतीजवळ, सर्व्हे नं. 225/डी पी साईड, मिरची पथारी एरिया) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात परिसरातील रहिवासी शफीउल्ला खान उर्फ शकील दादा (प्लॉट नं. 105, सिटी लाईट पार्क) यांनी प्रशासनाकडे तक्रार व मागणी अर्ज सादर केला आहे.
सदर परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन टाकलेली असतानाही अद्याप प्लॉटधारकांना नळ कनेक्शन सुरू करण्यात आलेले नाही. या भागात सध्या पाच ते सहा घरे पूर्णतः बांधून तयार असून त्यामध्ये कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, रहिवाशांना मूलभूत सुविधा असलेल्या पिण्याचे पाणी व (स्ट्रीट लाईट )वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे रमजान महिना सुरू होत असल्याने पाण्याची गरज अधिक वाढणार आहे. रोजच्या उपवास, स्वच्छता व धार्मिक कार्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. मात्र पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असून महिला, वृद्ध व लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या सोबतच या भागातील (स्ट्रीट लाईट ) बंद आहे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; रमजानपूर्वी तातडीने व्यवस्था करण्याची मागणीअसल्याची तक्रार असून अंधारात राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून विद्यार्थ्यांचे शिक्षण, घरगुती कामकाज वर विपरीत परिणाम होत आहे.
शफीउल्ला खान (शकील दादा) यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,
 तातडीने सिटी लाईट पार्क परिसरात नळ कनेक्शन सुरू करण्यात यावे.
 नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा.
 वीजपुरवठा त्वरित सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रमजानपूर्वीच प्रश्न मार्गी लावावा,
आता या प्रश्नाकडे संबंधित नगरपालिका व पाणीपुरवठा विभाग लक्ष देतो का, याकडे सिटी लाईट पार्क परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed