अमळनेर मुस्लिम खाटीक पंच मंडळातर्फे २० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न..

0
New-Doc-02-07-2026-10.08.jpg


अमळनेर /आबिद शेख


अमळनेर मुस्लिम खाटीक पंच मंडळाच्या वतीने समाजातील गरजू कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला २० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाचे अध्यक्ष युसुफ अ. लतीफ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली असून हे पठण वाहेद खाटीक यांनी केले.
या ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अंदाजे ११ ते १२ हजार समाजबांधव या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
कार्यक्रमास अखिल महाराष्ट्र खाटीक समाजाचे माजी अध्यक्ष एल. ए. शेख, हाजी हुस्नोद्दीन भाई, हाजी इब्राहिम सेठ, जिल्हाध्यक्ष अनवर भाई, गुजरात राज्य अध्यक्ष फिरोज भाई, फौजी शकील, मध्यप्रदेश अध्यक्ष वाहेद भाई, कासिम पहलवान, रईस सलीम, अकिल भाई दोंडाईचा, हाजी हकीम भाई, अरमान भाई, हाजी हारून भाई यांच्यासह विविध जिल्हा, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय अमळनेर येथील आमदार अनिलदादा यांची सौभाग्यवती जयश्री ताईसाहेब, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, तसेच नगरपालिका अधिकारी यांनी उपस्थित राहून नवविवाहित वधू-वरांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मुख्तार खाटीक, उपाध्यक्ष जाकीर अब्दुल्ला, सेक्रेटरी जाकीर गनी, खजिनदार इम्रान भाई, अनिस भाई, अब्बास भाई, आरिफ टेलर, रज्जाक भाई, आसिफ भाई, नुरजमाल भाई, तालुका अध्यक्ष मोहसिन भाई, तसेच सर्व टीम प्रमुख व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
यामध्ये युनूस शब्बीर, अर्शद भाई, शारुख आसिफ, कासिम भाई, सलीम यासिन, जुनेद भाई, अल्ताफ निसार, साबीर अब्दुल्ला, सुल्तान मुख्तार, दानिश भाई, मुजम्मिल युनूस, जाकीर भाई, सद्दाम भाई, इम्रान हारून, शाहरुख आदींनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा सेक्रेटरी हाजी शरीफ व महाराष्ट्र उपाध्यक्ष कैसर भाई यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जाकीर खाटीक व इम्रान भाई यांनी उपस्थित मान्यवर, समाजबांधव व सहकार्यांचे आभार मानले.
हा सामूहिक विवाह सोहळा समाजातील एकोप्याचे व सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून उपस्थितांनी आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed