अमळनेर तालुक्यात गांजाची बेकायदेशीर शेती उध्वस्त; एक बिघा क्षेत्रातील ओला व सुका गांजा जप्त..

0
New-Doc-02-07-2026-09.50.jpg


अमळनेर/ आबिद शेख
अमळनेर तालुक्यातील गडखाम्ब शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाची बेकायदेशीर शेती उद्ध्वस्त केली आहे. गट नंबर २३२४ मध्ये सुमारे एक बिघा क्षेत्रात गांजाची लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले असून ओला व सुका गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सुरेश लोटन पाटील (रा. गडखाम्ब) या शेतकऱ्याचे नाव समोर आले आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की गडखाम्ब शिवारात एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केली आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना पंचनाम्यासाठी सोबत घेतले.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, शरद काकळीज, नामदेव बोरकर यांच्यासह हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, सुनील तेली, विनोद सोनवणे, राहुल पाटील, उदय बोरसे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, संजय सोनवणे, श्यामल पारधी, निलेश पाटील, विनोद पाटील आदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दि. ७ रोजी सकाळी ६ वाजता शेतावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान संबंधित शेतकऱ्याने मका पिकासोबत गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. सुमारे सहा फूट उंचीची गांजाची झाडे मोठ्या प्रमाणात उगवलेली होती. तसेच शेतात पाच ते सात गोण्यांमध्ये ओला गांजा बांधून ठेवलेला आढळून आला. एका ठिकाणी गांजा वाळवण्यासाठी ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
चौकशीदरम्यान संबंधित शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी गांजा विकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व गांजाची झाडे उपटून नष्ट करण्यात येणार असून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला जाणार आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास अमळनेर पोलीस करत आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 157500

22 Ct सोने 91.60% : ₹. 144900

18 Ct सोने 75.00% : ₹. 119700

शुद्ध चांदी 999%:₹. 2600/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed