अमळनेर मुस्लिम खाटीक पंच मंडळातर्फे २० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर मुस्लिम खाटीक पंच मंडळातर्फे आयोजित २० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश येथून सुमारे ११ ते १२ हजार समाजबांधवांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष युसुफ अ. लतीफ हे होते. कार्यक्रमाची सुरुवात वाहेद खाटीक यांनी केलेल्या पवित्र कुरआन पठणाने झाली. सामूहिक विवाहातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना आधार देण्याचा उद्देश या सोहळ्यामागे असल्याचे अध्यक्षीय भाषणात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी अखिल महाराष्ट्र खाटीक समाजाचे माजी अध्यक्ष एल. ए. शेख, हाजी हुस्नोद्दीन भाई, इब्राहिम सेठ, जिल्हाध्यक्ष अन्वर भाई, गुजरात अध्यक्ष फिरोज भाई, फौजी शकील, मध्यप्रदेश अध्यक्ष वाहेद भाई, कासिम पहलवान, रईस सलीम, अकिल भाई (दोंडाईचा), हकीम भाई, अरमान भाई, हारून भाई यांच्यासह विविध जिल्हा, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक मान्यवरांमध्ये अमळनेर येथील आमदार यांच्या सौभाग्यवती जयश्री ताईसाहेब (अनिलदादा), पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, तसेच नगरपालिका अधिकारी यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मुख्तार खाटीक, उपाध्यक्ष जाकीर अब्दुल्ला, सेक्रेटरी जाकीर गनी, खजिनदार इम्रान भाई, अनिस भाई, अब्बास भाई, आरिफ टेलर, रज्जाक भाई, आसिफ भाई, नुरजमाल भाई, तालुका अध्यक्ष मोहसिन भाई यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
याशिवाय युनूस शब्बीर, अर्शद भाई, शारुख आसिफ, कासिम भाई, सलीम यासिन, जुनेद भाई, अल्ताफ निसार, साबीर अब्दुल्ला, सुल्तान मुख्तार, दानिश भाई, मुजम्मिल युनूस, जाकीर भाई, सद्दाम भाई, इम्रान हारुन, शाहरुख आदींनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सेक्रेटरी हाजी शरीफ व महाराष्ट्र उपाध्यक्ष कैसर भाई यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जाकीर खाटीक व इम्रान भाई यांनी उपस्थित मान्यवर, समाजबांधव व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
हा सामूहिक विवाह सोहळा सामाजिक एकोप्याचे व सेवाभावी उपक्रमाचे उत्कृष्ट उदाहरण ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
