२०–२५ दिवसांपासून तुंबलेली गटार अखेर मोकळी; सफाई कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीला यश..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील धुळे रोडवरील श्री स्वामी समर्थ गेटच्या बाजूला गेल्या २० ते २५ दिवसांपासून तुंबलेली गटार व चेंबर अखेर साफ करण्यात सफाई कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सातत्याने साचलेल्या घाण व पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अत्यंत मेहनत व धाडस दाखवत चेंबरमध्ये थेट उतरून ही सफाई केली. मोठ्या सळईच्या साहाय्याने आत अडकलेला कचरा काढण्यात आला. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर गटारातील अडथळा दूर झाला आणि साचलेल्या पाण्याचा निचरा सुरळीत सुरू झाला.
सफाई कर्मचाऱ्यांच्या या मेहनतीमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून, त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भविष्यात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नियमित देखभाल व वेळोवेळी गटारांची सफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 156000
22 Ct सोने 91.60% : ₹. 143500
18 Ct सोने 75.00% : ₹. 118500
शुद्ध चांदी 999%:₹. 2630/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
