मांडळ (ता. अमळनेर) येथे दिव्यांग बांधवांचे एकत्रित निवेदन; ५ टक्के निधी न दिल्यास अन्नत्याग उपोषणाचा इशारा..

0
New-Doc-02-04-2026-22.57.jpg

आबिद शेख/अमळनेर
मांडळ अमळनेर दिनांक ४ फेब्रुवारी २०२६, वार बुधवार रोजी मांडळ तालुका अमळनेर येथे गावातील दिव्यांग बांधव एकत्रित येऊन ग्रामपंचायतीकडून दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेला ५ टक्के निधी तात्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, नियम ३७) ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्नातून — जसे कर, शुल्क इत्यादींमधून — गोळा होणाऱ्या महसुलातील किमान पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र हा निधी दिव्यांगांपर्यंत पोहोचत नसल्याने दिव्यांग बांधवांनी संताप व्यक्त केला.
या संदर्भात मांडळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष शांताराम सखाराम कोळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक श्री. प्रांजल वाघ व सरपंच दीपक बडगुजर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताना उपस्थितांना संबोधित करताना जिल्हा अध्यक्ष शांताराम कोळी म्हणाले की, “जर आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आले तर ग्रामपंचायतीजवळ अन्नत्याग उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
यावेळी कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब कोळी, कोळी समाजसेवक संदीप सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष वासुदेव पवार उपस्थित होते. तसेच गावातील दिव्यांग बांधवांमध्ये दीपक बडगुजर, जितेंद्र कोळी, अमृत कोळी, नागो महाजन, हिरामण मराठे, ईश्वर कोळी, शांताराम पारधी, मांगुलाल भोई, संजय पाटील, रमेश वाकडे, दिनेश भिल, कैलास धनगर, जफर शेख, दानिश बेग, रेखाबाई पारधी, मोनीबाई कोळी, जयश्री कोळी, सुनंदाबाई कोळी, चंदनबाई महाजन यांच्यासह विविध जाती-धर्मांचे दिव्यांग बांधव व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दिव्यांग कल्याणासाठी शासनाने ठरवून दिलेला निधी वेळेत व पारदर्शकपणे खर्च करण्यात यावा, अशी सर्व दिव्यांग बांधवांची एकमुखी मागणी असून ग्रामपंचायतीने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 161000

22 Ct सोने 91.60% : ₹. 148100

18 Ct सोने 75.00% : ₹. 122300

शुद्ध चांदी 999%:₹. 2980/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed