अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने दर रविवारी बंद राहणार; बिल्डींग मटेरियल असोसिएशनची स्थापना..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल विक्रेते व्यापाऱ्यांची नुकतीच धुळे रोडवरील पाठक ट्रेडर्स येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीत सर्व बिल्डींग मटेरियल विक्रेते व्यापाऱ्यांनी एकत्र येत अमळनेर शहर बिल्डींग मटेरियल असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण पाठक (पाठक ट्रेडर्स), उपाध्यक्षपदी रोहन वाडीले (आर. आर. स्टील), सेक्रेटरीपदी हिरामण देवासी (आंबे स्टील) तर खजिनदारपदी संतोष पटेल (महादेव ट्रेडर्स) यांची एकमुखाने निवड करण्यात आली.
असोसिएशनच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण नियमावली ठरविण्यात आली असून, त्यामध्ये सर्व दुकानदारांनी सिमेंटची विक्री एकाच दरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, व्यापाऱ्यांच्या एकजुटीसाठी आणि कामगारांच्या हितासाठी अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल विक्रीची दुकाने दर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार ग्राहकांनी रविवार सोडून इतर दिवशीच खरेदीसाठी यावे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 161000
22 Ct सोने 91.60% : ₹. 148100
18 Ct सोने 75.00% : ₹. 122300
शुद्ध चांदी 999%:₹. 2980/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
