अमळनेरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शन व पाडळसरे धरणात अस्थी विसर्जन; भावपूर्ण आदरांजली..

0
IMG_20260204_075859.jpg


अमळनेर /आबिद शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे आज अमळनेर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दादांच्या अंतिम आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहरासह तालुक्यातील नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
अस्थिकलश दर्शनानंतर अमळनेर–धार–मारवड–कळमसरे–पाडळसरे या मार्गाने भव्य रथयात्रा काढण्यात आली. संपूर्ण मार्गावर दादांच्या स्मृतींना उजाळा देत ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी वातावरण भावनिक झाले होते. अनेक ठिकाणी कार्यकर्ते व नागरिकांनी पुष्पवृष्टी करत श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर पाडळसरे धरणात विधिवत धार्मिक विधींसह अस्थींचे विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याची, नेतृत्वाची व जनहितासाठी केलेल्या योगदानाची आठवण काढत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास माजी मंत्री व आमदार श्री. अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या श्रीमती प्रतिभाताई शिंदे, जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. संजय पवार, रावेर जिल्हाध्यक्ष श्री. उमेश नेमाडे यांच्यासह पक्षाचे विविध स्तरांवरील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात व विकासाच्या वाटचालीत दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 157000

22 Ct सोने 91.60% : ₹. 144000

18 Ct सोने 75.00% : ₹. 119300

शुद्ध चांदी 999%:₹. 2780/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed