नोबल इंग्लिश मीडियम स्कूल, धरणगाव येथे नन्हे-मुन्ने विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न..

0
New-Doc-02-04-2026-07.36.jpg


धरणगाव (प्रतिनिधी):
इक़रा वेलफेअर सोसायटी, धरणगाव यांच्या वतीने संचालित नोबल इंग्लिश मीडियम स्कूल, धरणगाव येथे ज्युनिअर के.जी. व सीनिअर के.जी.च्या नन्हे-मुन्ने विद्यार्थ्यांचा वार्षिक (सालाना) कार्यक्रम दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत आनंदी, उत्साही व जल्लोषपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन मोहल्ला भडंगपुरा, धरणगाव येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमास एरंडोल शहरातील जेष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व असलम पिंजारी साहेब, जळगावचे सैय्यद अकील पहलवान, धरणगाव शहर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी इरफान शेख तसेच नगरसेवक तौसीफ पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याशिवाय APJ अब्दुल कलाम विचार मंचचे सचिव शफी शाह, इक़बाल सर, रऊफ खान पठाण, वसीम खान कुरैशी, मुरसलीन जनाब, सैय्यद सज्जाद अली यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इक़रा वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नईम अहमद उस्मान गनी मोमिन, उपाध्यक्ष शेख अफसर शेख हाजी तय्यब, सचिव करीम खान, सदस्य रहेमान शाह, अब्दुल बारी सर व नदीम काझी यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे मेहनत व नियोजन करून कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला.
कार्यक्रमादरम्यान नन्हे-मुन्ने विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य, सांस्कृतिक सादरीकरणे व मनमोहक कार्यक्रम सादर करून आपल्या सुप्त कलागुणांचे उत्कृष्ट दर्शन घडवले. लहानग्यांच्या निष्पाप, गोंडस व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणांनी उपस्थित पाहुणे व पालक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक सादरीकरणानंतर प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट होत होता.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षकवर्ग व व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. अशा प्रकारचे वार्षिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
अतिशय आनंददायी, सौहार्दपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात हा वार्षिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून उपस्थित पालकांनी व नागरिकांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 157000

22 Ct सोने 91.60% : ₹. 144000

18 Ct सोने 75.00% : ₹. 119300

शुद्ध चांदी 999%:₹. 2780/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed