अमळनेरात अखिल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाजाचा पहिला ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळा; ५ फेब्रुवारीला २० जोडपी विवाहबंधनात..
अमळनेर /आबिद शेख
अखिल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाज, अमळनेर यांच्या वतीने समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने पहिल्या सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सामाजिक बांधिलकी जपणारा व ऐक्याचे दर्शन घडविणारा ऐतिहासिक विवाह सोहळा बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर येथे संपन्न होणार असून, यामध्ये सुमारे २० जोडपी विवाहबंधनात अडकणार आहेत.
हा सामूहिक विवाह सोहळा समाजासाठी मैलाचा दगड ठरणार असून, विवाहाचा वाढता खर्च कमी करून समाजातील तरुण-तरुणींना सन्मानाने विवाह करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समाजातील ऐक्य, सलोखा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन घडविणारा हा सोहळा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास मंत्री मा. गुलाबराव पाटील, माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच डॉ. माजी आमदार फारुक शाह, नगराध्यक्ष परिक्षित बाविस्कर, जळगाव येथील एजाज मलिक, करीम सालार, फारुक शेख यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाज पंच कमिटी, अमळनेर व इज्तेमाई शादी कमिटी कसोशीने परिश्रम घेत असून, नगरसेवक मुख्तार खाटीक (अध्यक्ष) यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य सक्रिय सहभाग घेत आहेत. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 157000
22 Ct सोने 91.60% : ₹. 144000
18 Ct सोने 75.00% : ₹. 119300
शुद्ध चांदी 999%:₹. 2780/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
