लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या घरमालकाच्या घरात चोरी; ६६ हजारांचे दागिने लंपास..

0
New-Doc-02-03-2026-07.50.jpg


अमळनेर /आबिद शेख
लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या घरमालकाच्या बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत घर फोडून सुमारे ६६ हजार रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस आली.
मोईनखान हबीबखान पठाण (रा. गांधलीपुरा चौकीजवळ) यांचे गरीबनवाज चौकात मेडिकल दुकान आहे. ते ३१ जानेवारी रोजी रात्री नातेवाईकांच्या लग्नासाठी सुरत (गुजरात) येथे गेले होते. २ फेब्रुवारी रोजी पहाटे घरी परत आल्यानंतर घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
चोरट्यांनी घराच्या खालच्या व वरच्या मजल्यावरील मागील दारांचे कडी-कोंडा व कुलूप तोडले. तसेच कपाटे व लॉकरचे कुलूप फोडून घरातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे व अंगठी, सुमारे ५ हजार रुपयांची चांदी तसेच १ हजार रुपयांचे चांदीचे कडे असा एकूण अंदाजे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३३१ (४), ३३१ (५) व ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 153000

22 Ct सोने 91.60% : ₹. 141000

18 Ct सोने 75.00% : ₹. 116300

शुद्ध चांदी 999%:₹. 2650/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed