पैसे पडल्याचे भासवून अडत व्यापाऱ्याची पिशवी लांबवणारा आरोपी अवघ्या एका तासात जेरबंद. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत..

0
New-Doc-02-03-2026-08.02.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर :- पैसे खाली पडल्याचे भासवून अडत व्यापाऱ्याच्या मोटारसायकलवर ठेवलेली रोख रकमेची पिशवी लांबवणाऱ्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक करून चोरीस गेलेली रक्कम हस्तगत केली आहे.
बहादरपूर रस्त्यावरील झामी चौक येथील अडत व्यापारी आण्णा साहेबराव महाजन हे दि. २ रोजी दुपारी १२:३० वाजता मोटारसायकल (क्र. MH 19 DX 4057) वरून एकूण २ लाख ८ हजार रुपये बँकेत भरण्यासाठी निघाले होते. त्यांनी १ लाख ३० हजार रुपये आयसीआयसीआय बँकेत जमा केल्यानंतर उरलेले ७८ हजार रुपये जमा करण्यासाठी महाराष्ट्र बँकेत गेले.
दुपारी सुमारे १:५० वाजता बँकेबाहेर पडत असताना एका अनोळखी व्यक्तीने “तुमचे पैसे खाली पडले आहेत” असे सांगितले. आण्णा महाजन पैसे उचलण्यासाठी खाली वाकले असता त्या इसमाने त्यांच्या मोटारसायकलला लावलेली रोख रकमेची पिशवी चोरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शरद व काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव व नितीन मनोरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन ते चार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी चोपड्याकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी चोपडा पोलिसांशी संपर्क साधला. चोपडा पोलिसांनी वेल्हे गावाजवळ संशयितांना थांबवून ठेवले. तपासादरम्यान आरोपींनी आपली नावे शीनू उर्फ बाळू बारगुंडा, शिवकुमार व्यंकटस्वामी बारगुंडा व गणेश शुबरमणी तेली (रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) अशी सांगितली.
पोलिसांच्या जलद व समन्वयपूर्ण कारवाईमुळे चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात यश आले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 153000

22 Ct सोने 91.60% : ₹. 141000

18 Ct सोने 75.00% : ₹. 116300

शुद्ध चांदी 999%:₹. 2650/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed