अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

0
New-Doc-02-03-2026-07.40.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर :- येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी बालवाडी विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन ३१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अत्यंत उत्साहपूर्ण व भव्य वातावरणात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नृत्य, नाटिका व पालकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी गेल्या महिनाभरापासून कार्यक्रमाची काटेकोर तयारी केली होती. प्रत्येक वर्गाने सादर केलेले ग्रुप डान्स विशेष आकर्षण ठरले. नर्सरी विभागासाठी शिसोदे मॅडम तर नाटिकेसाठी वैभवी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. चिमुकल्यांनी सादर केलेली नृत्ये आणि नाटिका पाहून पालक भारावून गेले.
या स्नेहसंमेलनात पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पालकांनी आपल्या पाल्यासोबत विविध नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत भरली. यावेळी महिला पालकांनी मनोरंजनात्मक खेळांमध्ये सहभाग घेत उत्साह दाखविला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, संचालक प्रा. एस. जे. शेख, किरण पाटील, मगन पाटील तसेच सर्व कार्यकारी मंडळाचे सदस्य व संस्थेअंतर्गत चारही शाळांचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.
प्रारंभी बालवाडीच्या विद्यार्थिनींसह अनिता पाटील, भारती बडगुजर, अश्विनी लांडगे व निकिता महाजन यांनी नृत्यातून स्वागत गीत सादर केले. यानंतर सचिव संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत, लहान वयात नृत्य, गाणी व सर्जनशील उपक्रमांचे बालविकासातील महत्त्व पालकांना पटवून दिले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लतिका शिंगाणे व सौ. अश्विनी लांडगे यांनी प्रभावीपणे केले. मुख्याध्यापिका सौ. वैशाली महाजन व सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व आनंददायी वातावरणात पार पडला. शेवटी सौ. ज्योती सोनार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 153000

22 Ct सोने 91.60% : ₹. 141000

18 Ct सोने 75.00% : ₹. 116300

शुद्ध चांदी 999%:₹. 2650/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed