“सतत वेळ पाळणाऱ्या अजितदादांनी जीवनाची वेळ पाळली नाही” – सर्वपक्षीय शोकसभेत आमदार अनिल पाटील यांची भावनिक श्रद्धांजली..
अमळनेर/ आबिद शेख
सतत वेळ पाळणारे, शिस्तप्रिय आणि विकासाचे प्रतीक असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी २८ रोजी जीवनाची वेळ पाळली नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारे आहे. नियतीने असे कार्य केले की आता आम्ही कोणाकडे पाहायचे, असा हृदयस्पर्शी सवाल करत आमदार अनिल पाटील यांनी अजितदादांप्रती आपले ऋण व्यक्त केले. अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत त्यांनी ही भावनिक श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार अनिल पाटील म्हणाले की, २०१६ साली माझ्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला होता. त्या काळात मी भाजपमध्ये असतानाही अजितदादांनी माझ्या पाठीवर आधाराचा हात ठेवला. तो आधार नसता तर कदाचित मी आत्महत्येचा विचारही केला असता. अशा शब्दांत त्यांनी अजितदादांच्या संवेदनशील नेतृत्वाची आठवण करून दिली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक १ रोजी सकाळी ९ वाजता अमळनेर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर तालुक्यात झालेल्या विकासात्मक कायापालटात अजितदादांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. आमदारांच्या समस्या ऐकून प्रत्येकाशी भावाप्रमाणे वागणूक देत न्याय देण्याचे काम त्यांनी कायम केले, असेही ते म्हणाले.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पाडळसरे धरणाच्या रखडलेल्या कामाला गती देऊन आज दिसणारा पाणीसाठा ही अजितदादांचीच देण असल्याचे नमूद केले. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, भैरवी पलांडे, डॉ. अविनाश जोशी, संजय पुनाजी पाटील, संदीप घोरपडे, डी. एम. पाटील, शिवाजी पाटील, बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, भागवत पाटील, खा. शि. मंडळ चेअरमन निरज अग्रवाल, वसुंधरा लांडगे, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, सरपंच संघटनेतर्फे महेंद्र बोरसे, ॲड. शकील काझी, ॲड. तिलोत्तमा पाटील, मंगळ ग्रह मंदिरतर्फे दिलीप बहिरम, आम आदमी पार्टीतर्फे प्रा. गणेश पवार, नितीन भदाणे, इम्रान खाटिक, रिपाईतर्फे यशवंत बैसाणे, शिवसेनेतर्फे महेश देशमुख, अनिल शिसोदे, मुन्ना शर्मा, अमित पाटील, प्रा. योगिता कापडणे यांनी आपल्या मनोगतातून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
शोकसभेचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
या शोकसभेचे आयोजन मराठा समाजाचे विक्रांत पाटील, संजय पाटील, भाजपतर्फे शीतल देशमुख, उमेश वाल्हे, पत्रकार संघाचे चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, राष्ट्रवादीचे भूषण भदाणे, शेतकरी संघाचे संजय पाटील तसेच विविध पक्ष व समाजातील पदाधिकाऱ्यांनी केले होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, बिपीन पाटील, ॲड. ललिता पाटील, सुलोचना वाघ, रिटा बाविस्कर, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, सुषमा देसले, प्रा. अशोक पवार, मुक्तार खाटीक, राजेंद्र देशमुख, श्याम पाटील, हेमंत पवार, दाऊदी बोहरा समाजाचे प्रतिनिधी, नगर परिषद अधिकारी-कर्मचारी संघटना, जिल्हा बँक कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक संघटना, व्यापारी, कामगार, विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे तसेच सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 155000
22 Ct सोने 91.60% : ₹. 142600
18 Ct सोने 75.00% : ₹. 117800
शुद्ध चांदी 999%:₹. 2850/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
