केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ : ‘विकसित भारत’च्या दिशेने ठोस पावले, महिलांच्या सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य – खासदार स्मिता वाघ.
24 प्राईम न्यूज 2 Feb 2026
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १२ वर्षांच्या स्थिर शासनकाळातील आर्थिक शिस्त, धोरणात्मक सातत्य आणि सुधारणा यांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसून येते. जागतिक स्तरावरील आव्हानात्मक परिस्थिती असूनही भारताने सुमारे ७ टक्क्यांचा विकासदर कायम राखला असून, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’च्या दिशेने मजबूत पायाभरणी करणारा ठरेल, असे मत जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनी व्यक्त केले.
या अर्थसंकल्पात सामाजिक प्रभाव, समावेशक विकास आणि जनकल्याणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. विशेषतः महिलांच्या सशक्तीकरणावर मोठा भर देण्यात आला असून लक्ष्मीपती दीदी योजना, महिला उद्योजकतेला चालना, बालिका शिक्षण, STEM क्षेत्रातील प्रोत्साहन तसेच महिला-नेतृत्वाखालील विविध योजनांचा विस्तार करण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे महिलांना राष्ट्रनिर्माणात सक्रिय व सक्षम भागीदार बनवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असे खासदार वाघ यांनी सांगितले.
युवा, शेतकरी, कामगार आणि MSME क्षेत्र हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख केंद्रबिंदू आहेत. AI-आधारित कौशल्य विकास, नव्या रोजगार संधींची निर्मिती, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबुती तसेच उद्योग व उत्पादन क्षेत्रासाठी भांडवली गुंतवणुकीवर विशेष भर देण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील जळगावसह विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक, कृषी, लॉजिस्टिक्स, महिला स्वयंसहाय्यता गट (SHG) आणि रोजगार क्षेत्रांना नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकूणच, हा अर्थसंकल्प विकासोन्मुख, जनकल्याणकारी, समावेशक आणि भविष्याभिमुख असून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ आणि ‘सबका मजबूत’ या संकल्पनांना अधिक बळ देणारा आहे, असे मत खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 155000
22 Ct सोने 91.60% : ₹. 142600
18 Ct सोने 75.00% : ₹. 117800
शुद्ध चांदी 999%:₹. 2850/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
