दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमळनेरात रविवारी सर्वपक्षीय शोकसभा..
अमळनेर/ आबिद शेख
राज्याचे उपमुख्यमंत्री, दमदार नेतृत्व आणि सर्वसामान्यांचे लाडके नेते दिवंगत अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण राज्यासह अमळनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या स्मृतीस सामूहिक व सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अजितदादा पवार आणि अमळनेरचा विकास यांचे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून अतूट व हक्काचे नाते होते. अमळनेर तालुक्याच्या पाणीप्रश्नापासून विविध विकासकामांपर्यंत त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने अमळनेरने आपला खरा हितचिंतक गमावला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या शोकसभेस अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संस्था, व्यापारी, शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, आशा वर्कर्स, लाडक्या बहिणी, डॉक्टर, लायन्स व रोटरी क्लब, महिला मंडळे, महसूल संघटना, वकील संघ, पत्रकार संघटना, धरण संघर्ष समिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक संघ, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, भाजीपाला विक्रेते, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आजी-माजी नगरसेवक, एस.टी. कर्मचारी, टॅक्सी युनियन, सर्व समाज पंचमंडळ तसेच इतर सर्व संघटनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अजितदादांच्या ऋणातून अमळनेर कधीही उतराई होऊ शकणार नाही. मात्र या सार्वजनिक शोकसभेतून त्यांच्या प्रती असलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 169000
22 Ct सोने 91.60% : ₹. 155500
18 Ct सोने 75.00% : ₹. 128500
शुद्ध चांदी 999%:₹. 3450/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
