अमळनेर न्यायालयात सुनावणीदरम्यान मंडळ अधिकाऱ्यास हृदयविकाराचा झटका; वकिलांच्या तत्पर ‘सीपीआर’मुळे प्राण वाचले.
अमळनेर : आबिद शेख
तालुक्यातील जिल्हा न्यायालय क्रमांक दोनमध्ये सुरू असलेल्या एका कौटुंबिक खटल्याच्या सुनावणीदरम्यान एक थरारक प्रसंग घडला. पुणे येथील रहिवाशी व मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रकाश केरनाथ कांबळे यांना अचानक तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला. झटक्यामुळे ते थेट न्यायालयातच कोसळल्याने काही क्षणांत परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रसंगाची गंभीरता ओळखून ॲड. प्रशांत संदानशिव यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. त्यांच्या सोबत ॲड. जगदीश बडगुजर, ॲड. राकेश पाटील, शरद ब्रम्हे तसेच न्यायालयाचे अधीक्षक व कर्मचारी मदतीसाठी पुढे आले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून कांबळे यांना तात्काळ ‘सीपीआर’ (हृदयपुनरुज्जीवन प्रक्रिया) देण्यात आली. काही क्षणांतच त्यांना शुद्ध आली.
यानंतर ॲड. संदानशिव यांनी स्वतःच्या वाहनातून कांबळे यांना त्वरित डॉ. बहुगुणे यांच्या दवाखान्यात दाखल केले. तपासणीनंतर डॉ. बहुगुणे यांनी कांबळे यांची प्रकृती सध्या स्थिर असून धोका टळल्याची माहिती दिली.
वकिलांच्या चातुर्याने, तत्परतेने व मानवी संवेदनशीलतेमुळे एका अधिकाऱ्याचे प्राण वाचल्याने न्यायालय परिसरात या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 163800
22 Ct सोने 91.60% : ₹. 150700
18 Ct सोने 75.00% : ₹. 124500
शुद्ध चांदी 999%:₹. 3580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
