अमळनेर पोलीसांच्या मोठ्या कारवाईत मोटारसायकल चोरी करणारा अटकेत; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त..
अमळनेर | आबिद शेख
अमळनेर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीसांनी प्रभावी व तांत्रिक तपास करत चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून सव्वा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी (जळगाव), मा. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परीमंडळ), मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायकराव कोते तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
अमळनेर पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर 503/2025 व 13/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये दाखल गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मोटारसायकली व अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच विविध ठिकाणांचा डम्प डेटा तपासला. या तपासाअंती चोरी करणारा इसम अरबाज शेख साजीद मनियार (वय 28, रा. धुळे) यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत आरोपीने अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या मोटारसायकली धुळे शहरात लपवून ठेवल्याची माहिती दिली.
मा. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची परवानगी घेऊन व पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने धुळे शहरात जाऊन खालील मोटारसायकली जप्त केल्या—
हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस डीआरएस (काळा व ग्रे रंग)
अंदाजे किंमत : ₹30,000
क्रमांक : MH-19 EJ 5439
सुझुकी कंपनीची Access 125 (काळ्या रंगाची)
अंदाजे किंमत : ₹50,000
क्रमांक : MH-18 BY 6692
सुझुकी कंपनीची Access 125 (निळ्या रंगाची)
अंदाजे किंमत : ₹50,000
क्रमांक : MH-39 AN 8269
अशा प्रकारे एकूण ₹1,30,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मोटारसायकलींचा सविस्तर पंचनामा करून त्या अमळनेर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आल्या आहेत.
सदर आरोपी अरबाज शेख साजीद मनियार यास अमळनेर पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर 308/2025, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/1886 चंद्रकांत पाटील करत असून, गुन्हा रजिस्टर नंबर 13/2026 चा तपास पोहेकॉ/1998 मिलिंद सोनार हे करीत आहेत.
या यशस्वी कारवाईमुळे अमळनेर परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक केले असून चोरीच्या घटनांवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 163800
22 Ct सोने 91.60% : ₹. 150700
18 Ct सोने 75.00% : ₹. 124500
शुद्ध चांदी 999%:₹. 3580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
