अल खिदमत ट्रस्ट अमळनेर यांच्यावतीने मोफत वैद्यकीय व औषधोपचार शिबिर..

0
New-Doc-01-27-2026-22.32.jpg


अमळनेर | आबिद शेख
अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या वतीने इस्लामपुरा मशिद कॉम्प्लेक्स येथे मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या बुधवार रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये डॉ. फिरोज शेख व डॉ. शारमीन बागवान रुग्णांची तपासणी करणार असून नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला व औषधे दिली जाणार आहेत. यावेळी रक्तदाब (BP), रक्तातील साखर (ब्लड शुगर), नाडी (पल्स) तसेच ऑक्सिजन लेव्हल यांची तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.
सदर वैद्यकीय शिबिर दर आठवड्याला बुधवार व रविवार या दिवशी नियमितपणे आयोजित करण्यात येते.
हे शिबिर अल खिदमत ट्रस्ट कार्यालय, इस्लामपुरा मशिद कॉम्प्लेक्स, अमळनेर येथे होत असून नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 163800

22 Ct सोने 91.60% : ₹. 150700

18 Ct सोने 75.00% : ₹. 124500

शुद्ध चांदी 999%:₹. 3580/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed