ब्रह्माकुमारीज तर्फे फरांदे पार्क येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…
नांदेड | दि. २६ जानेवारी २०२६ (सोमवार)
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क, नांदेड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्ती, शिस्त, उत्साह व आध्यात्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारीज अनिता दीदी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वज फडकताच उपस्थितांनी एकमुखाने राष्ट्रगीत सादर करत देशाप्रती आपला अभिमान व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना बि.के. अनिता दीदी म्हणाल्या, “गणतंत्र दिवस हा असा संदेश देतो की योजना, कार्य आणि मार्ग वेगवेगळे असले तरी आपला उद्देश, संकल्प आणि मंजिल एकच असली पाहिजे.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांना देशसेवा व मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ बि.के. डॉ. रामरावजी जाधव भाई, प्रा. निळकंठ जाधव भाई, सुधाकर कदम भाई, बि.के. मुरलीधर भाई, डॉ. आनंदरावजी मनूरकर भाई, वाखरडकर स्वामी भाई, रुपेश पाटील भाई, बि.आर. मोरे, भारत गंदेवार, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे भाई, डॉ. कल्पना जाधव, गोरे माता, स्वामी माता तसेच बि.के. रोहिणी बहन, सुषमा बहन, सरोजिनी बहन, सोनाली बहन, शिवलीला बहन, ऋतुजा बहन यांच्यासह फरांदे पार्क व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला
