रवि ज्वेलर्सच्या लकी कूपन योजनेचा भव्य लकी ड्रॉ उत्साहात संपन्न. ₹10,000 च्या दागिने खरेदीवर मिळालेल्या कूपनमधून ई-स्कूटर, वॉशिंग मशीन व स्मार्ट टीव्ही जिंकणारे मानकरी..

0
New-Doc-01-25-2026-22.40.jpg


अमळनेर/ आबिद शेख
अमळनेर शहरातील नामांकित दागिने प्रतिष्ठान रवि ज्वेलर्स यांच्या वतीने ग्राहकांसाठी राबविण्यात आलेल्या “प्रत्येक ₹10,000/- च्या दागिने खरेदीवर लकी कूपन योजना” अंतर्गत आज बहुप्रतिक्षित लकी ड्रॉ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास ग्राहकांसह मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
या लकी ड्रॉमध्ये आकर्षक आणि उपयुक्त बक्षिसांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले.
प्रथम पारितोषिक म्हणून ई-स्कूटर जिंकण्याचा मान कूपन क्रमांक 4247 धारक संजय बारी (कुंभारटेक, अमळनेर) यांना मिळाला.
द्वितीय पारितोषिक म्हणून वॉशिंग मशीन कूपन क्रमांक 3764 धारक सनी जाधव (झामी चौक, अमळनेर) यांनी पटकावले.
तर तृतीय पारितोषिक म्हणून स्मार्ट टीव्ही कूपन क्रमांक 3814 धारक राहुल रतीलाल बोरसे (पैलाड़, अमळनेर) यांना मिळाले.
या लकी ड्रॉ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून
श्रीमती राजश्री राजेश पाटील (सरपंच, हिंगोणे),
प्रा. एस. ओ. माळी सर (माजी उपप्राचार्य, प्रताप कॉलेज),
रतनलालजी वर्मा,रवि ज्वेलर्सचे संस्थापक श्री. विजयकुमार नारायणजी वर्मा यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संचालक रवि वर्मा, निखील वर्मा, तसेच मोनिका रवि वर्मा, गुंजन निखिल वर्मा व संपूर्ण वर्मा परिवारातील सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.
यावेळी मान्यवरांनी बोलताना सांगितले की, रवि ज्वेलर्सने ग्राहकांचा विश्वास जपण्यासोबतच अशा नाविन्यपूर्ण योजनांद्वारे ग्राहकांशी आपले नाते अधिक दृढ केले आहे. लकी कूपन योजनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने भविष्यातही अशाच आकर्षक योजना राबविण्यात येतील, असे संकेत व्यवस्थापनाकडून देण्यात आले.
लकी ड्रॉच्या निकालानंतर विजेत्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी आनंदाचे, उत्साहाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
रवि ज्वेलर्सच्या या योजनेमुळे अमळनेर शहरासह परिसरातील ग्राहकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, ग्राहकाभिमुख उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed